Posts

*महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक मंडळ संलग्न सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेतल्या गेलेल्या विज्ञान प्राविण्य परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मार्डी ची फातिमा शेख उत्तर सोलापूर तालुक्यात प्रथम*महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक मंडळ संलग्न सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळातर्फे घेतल्या गेलेल्या विज्ञान परीक्षेत प्रज्ञा परीक्षेसाठी अकरा हजार पाचशे विद्यार्थी बसले होते , त्यापैकी 2050 विद्यार्थी प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले होते व त्यातून प्रत्येक तालुक्यातून तीन विद्यार्थ्यांची *प्राविण्य परीक्षे करिता निवड करण्यात आली. यामध्ये *उत्तर सोलापूर तालुक्यातून इयत्ता सहावी साठी कु. फातिमा इरफान शेख ही प्रथम आली*. विज्ञान अध्यापक मंडळाच्या या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी फातिमा ही जिल्हा परिषद शाळेची पहिलीच विद्यार्थ्यांनी आहे. तिला विज्ञान विषय शिक्षिका डॉ. माधुरी भोसले मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व लोकमंगल अग्रिकल्चर महाविद्यालय वडाळा येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. व्यंकटेश गंभीरे सर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित उत्तर सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी श्री सिद्धेश्वर निम्बर्गी साहेब, यांनी फातिमा व मार्गदर्शक शिक्षिका डॉ. माधुरी भोसले मॅडम यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला डाएटचे अधिव्याख्याता श्री शिंदे सर, तसेच सोलापूर जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष जवंजाळ सर व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून सर्व विज्ञान प्रेमी शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते. तिच्या यशाबद्दल तिचे व मार्गदर्शक शिक्षिका भोसले मॅडम मुख्याध्यापक साळुंखे सर सर्व शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन समिती मार्डी, यांच्याकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Image

My school my Activity