*जिच्या हाती पाळण्याची दोरी* .....
*जिच्या हाती पाळण्याची दोरी* ..... अण्णा ! ए अण्णा....वैभवच्या हाकेनं अण्णा भानावर आला. साठी ओलांडलेला अण्णा शरीरानं धडधागट असला तरी मनानं पार खंगला होता.नियतीसमोर पार लुळा पडला होता. "रकमा आये....अगं... बघ की...हा अण्णा कसा करतोय..." वैभव घाबरून म्हणाला. कसबसं स्वतःला सावरत डोळे किलकिले करत अण्णा सावध झाला, वैभूच्या डोक्यावरून हात फिरवू लागला... "गुणाचं माझं पोरं..."असं म्हणत थरथरत्या हाताने वैभवला जवळ घेवून कुरवाळू लागला व त्याच्या कपाळाचा मुका घेता घेताच ढसढसा रडू लागला. "अण्णा अरं जरा कमी ढोसत जा की अरं तू असा पडला की मला लय भ्या वाटतयं बघ." असं म्हणत अण्णा अन् वैभव दोघेही गळ्यात गळाघालून रडायला लागले. शर्टाच्या बाहीने नाक अन् डोळे पुसत, मुसमुसतचं वैभव म्हाता-या अण्णाला मोठ्या माणसागत समजावून सांगू लागला, "अण्णा अरं आत्ता कुठं मी तिसरीत हाय, मी मोप शाणा हाय, मला जरा तर कळतयं पण.. तू आपल्या बाईकडं तर बघ आता कुठं अंगणवाडीत जात्याय ती.." अन् तेवढ्यात इवलीशी बाई दुडुदुडु धावत येऊन अण्णाच्या पांढ र्या झालेल्या ...