पहिला पाऊस
विरहात सख्या तुझ्या
पहिला पाऊस ही
हळवा झाला होता
प्रेमाची संतत धार बनून
साथ माझी करत होता...
रेशमी स्पर्श तुझा .....
सहवासात त्याच्या विरला होता
धो धो कोसळणारा पाऊस
बावरलेल्या मनाला
प्रेमाचा अर्थ समजावत होता..
तुझ्या सोबतीचे गूज....
क्षितिजावर ओसांडत होता
विरून बंध सारे
सोनेरी स्वप्नांचे
तुझेच गीत गात होता...
हुंदके माझ्या रूदनाचे...
अशा कातरवेळी
शिंपित होता
सोहळा तुझ्या विरहाचा
श्वासात माझ्या रूजवित होता....
Comments
Post a Comment