नारी तू....
💃🏿......💃🏿
त्याग, नम्रता, श्रद्धा अन्
वात्सल्याची मूर्ती तू...
झाशीवाली मर्दानी अन्
शिवबाला घडविणारी
जिजाऊ तू ... !!!
सहनशीलता, शक्ती, भक्ती अन्
कारुण्याची मूर्ती तू...
अंबरासही कवेत घेणारी
अंतराळ विरांगना अन्
ज्ञानज्योत पेटविणारी
सावित्री तू...!!!
चातुर्य, बुद्धिमता, वीरता अन्
उदारपणाची मूर्ती तू...
सांब शिवाचे शक्तीरुप अन्
कणखर नेतृत्व करणारी
इंदिरा तू...!!!
प्रेम, दया, सजगता अन्
सात्त्विकतेची मूर्ती तू...
नवनिर्मितीचा ध्यास अन्
क्षितिजापलीकडे झेपावणारी
यशोगाथा
Comments
Post a Comment