कैफियत प्रेमाची
मिलनाचे चित्र होते
अंतरी मी रेखिले
तुझ्या माझ्यात होते
विश्व सारे देखिले
सीमा तू ओलांडली
सांडूनि प्रीत आपुली
अशाश्वत कायेसाठी
रूपगंधा, प्रीत विरघळली
ह्रदयात शोध माझ्या
स्पंदने तुझीच खोलवरी
जाळूनी आयुष्य सारे
वाहिले मी तव चरणावरी
प्राणाहून ही प्रिय मज
स्वप्न सुंदर ही कथा
नकोस अशी उलथवू
उरी जपते मी ही व्यथा
जरी न कळले तुजला
गुंफीण गीत प्रितीचे
नकोस छेडू मजला
हे देणे नक्षत्राचे....
Very nice
ReplyDeleteभावपूर्ण
ReplyDelete