कविता असते......
कविता असते...
सुमधूर संगीत
खळाळणारा निर्झर
अविरत झिरपणारा
शब्दांचा पाझर
कविता असते...
प्रतिभेचा बहर
मनातले उधाण
शब्दातून उसळणारी
बेधुंद लहर
कविता असते...
शब्दांचे गान
वास्तवाचे भान
शब्दानेच सोडलेला
अचूक बाण
कविता असते...
मीरेची भक्ती
सुदाम्याची प्रिती
ओतप्रोत ओसांडणारी
शब्दांची किर्ती
कविता असते...
अलौकिक प्रतिभा
शब्दांचा महिमा
मनमंदिरी दरवळणारी
शब्दसाधना
Comments
Post a Comment