मागणे
ना दुखो मन कोणाचे
ना द्वेष कुणाचा व्हावा
रंजल्या गांजल्या साठी
तू कार्या तत्पर व्हावा
जे सत्यासाठी लढती
कैवारी हो तू तयांचा
दुर्बल, दुःखी अनाथ
वाली होवून दीनांचा..
हरूनी तिमिर सारा
देई प्रकाश सर्वदा
सत्य,सुंदर, शिवाचा
ध्यास असूदे सर्वथा..
मधूर हसशी जेव्हा
उमलत्या फुलांतूनी
बरसू दे नितिमत्ता
शुभ्र जलधारातूनी..
सन्मार्ग आणि सन्मती
रुजूदे शुद्ध विचार
मंगलमय हो सारे
माणुसकी धारदार
डाॅ. माधुरी भोसले
Comments
Post a Comment