वसुंधरा ....
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
नटखट, चंचल लोभसवाणे
वसुंधरेचे रूप देखणे
चाँद - सितारे फिदा तुजवर
नतमस्तक मी तव चरणांवर
🌳
हिरवा शालू नेसून सजली
गोड गाली खळी उमटली
गवतफुलांची ओढून चादर
नतमस्तक मी तव चरणांवर
🌳
हिरवी किमया सळसळ करती
दवबिंदूचे मोती होती
तृणमखमालीचे गालिचे सुंदर
नतमस्तक मी तव चरणांवर 🌳🌳
शुभ्र धुक्याची कसरत न्यारी
इंद्रधनुची प्रीत गोजिरी
सप्तरंगी न्हाऊन अंगभर
नतमस्तक मी तव चरणांवर 🌳🌳
Comments
Post a Comment