प्रेमात तुझ्या...
❣❣💓💓💕💕💕💞💞💞
बहरली प्रीत तुझी माझी
बावरून गेले पुन्हा...
गंधित पाकळ्या नव्याने
खुणावू लागल्या मना..
शीळ घालूनि काय सांगतो
सळसळणारा खट्याळ वारा
शृंगारिक बागेश्रीही छेडू लागला
सप्तसुरांच्या अलगद तारा...
विस्तीर्ण नभही करू लागले
युगंधरेशी कसले हितगूज
शब्द झाले अबोल सारे
ऐकता ही मूक कुजबूज..
स्पर्श रेशमी तुझा उमलवी
हजारो तरंग इथे
साहवेना भार प्रितीचा
तरीही तू का अनभिज्ञ तिथे..
Comments
Post a Comment