महती स्वातंत्र्याची
भारत माता आमुची माता हर्षूनि जाती
ऐकूनी स्वातंत्र्याची महती ॥धृ॥
हरित क्रांती, धवल क्रांती
विज्ञानाने केली क्रांती
हिमालयाची अभिमानाने
फुलली हो छाती...॥1 ॥
घोडदौड ही तरूणाईची
स्वप्ने पाहती महासत्तेची
साध्य करण्या व्हीजन पूर्ती
जनता सारी अहोरात्र कष्टती..॥2॥
निळ्या, हिरव्या, भगव्याची
युती होते सार्यांची
वज्रमूठ पाहून ऐक्याची
शत्रूला हो भरते धडकी..॥3॥
प्राचीन इथल्या संस्कृतीची
क्षमाशील अन् दातृत्वाची
ऐकून ख्याती पराक्रमाची
भूमाता ही हर्षूनिया जाती..॥4
॥
Comments
Post a Comment