ЁЯМ╣рд╕рдЦ्рдпा рд░े ЁЯМ╣
प्रेमात तुझ्या सख्या रे आकंठ मी बुडावे
माझ्यात तू अन् तुझ्यात मी एकरूप व्हावे
श्रेष्ठत्व मनोमिलनाचे प्रितितूनी उमगावे
प्रेमाअडून कामवासनाचे प्रदर्शन ना घडावे
प्रतिबिंब भावनांचे तुझसवे फुलून यावे
अमरत्व प्रितीस आपुल्या सत्यवान सावित्री परी लाभावे
प्रित शाम राधेची हरघडी प्रत्ययास यावी
प्रेमाची ती निरागसता परमोच्च रूप घ्यावी
निरभ्र आकाशाप्रमाणे श्वास हा मोकळा व्हावा
अविश्वासाला इथे कधीच थारा नसावा
नित्यनिरंतर दिन निशिदिन प्रीत ही अंकुरावी
नात्यापल्याडच्या प्रेमाची अनुभूती तुजसवे यावी
Comments
Post a Comment