बा विठ्ठला
*काव्यप्रकार-भक्तीगीत*
➖➖➖➖➖➖➖➖➖
सावळया विठ्ठला आतुरले भेटी
हरपले देहभान रे जगजेटी
कौतुके पाहती सोहळा वारीचा
टाळ मृदंगाचा गजर हरीचा
अबिरगुलाल तुळशीमंजिरीचा
सावळया विठूच्या चरणभेटीचा
रिंगणी रंगले भक्तगण सारे
उडया,फुगडया,सुरपाटया रे
विसरुनी भेद एकरूप झाले
सावळया विठूच्या चरणी
लीन झाले
नभांगण सारे उजळून गेले
बंधू भेटीचे सोहळे रंगले
होवून निःसंगे वारकरी सारे
पंढरी विसावण्या अधीर सारे
बेधुंद होऊन किर्तनी नाचती
विठूरायाचे कौतुके रंगती
अधीर हे मन जाई रे भरुनी
देई ठाव बा विठ्ठला हीच विनवणी
छानच
ReplyDelete