माझं माहेर....
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
💃🏿 ........ 💃🏿
मन जाते मोहरुनी
हुरहूर लागे मनी
दाटले ग अश्रू नयनी
माहेराच्या आठवांनी
सोलापूर जिल्ह्याचा अभिमान
माहेर माझ सुरेख छान
माळढोक वाढवी शान🦆🦆
पर्यटकांचे आकर्षण
द्राक्ष बागांसाठी गाजलेलं🍇🍇
माहेर माझ नावाजलेलं
निशिदिन गजबजलेलं
कष्टाळू ग गाववालं
माहूरगडचं ग इथे ठाणं
माहेर माझ भाग्यवान 🙏🏻🙏🏻
गावोगाविचे हो जन
विसावती गुण्यागोविंदानं
भावंडांचा गोतावळा 👩👩👧👦👫
मस्तीची ती पाठशाला
नान्नज गावाचा ग लळा
जसा बहरे पानमळा
बालपणीच्या पाऊलखुणा
शोधिते मी पुन्हा पुन्हा 👷🏻♀👷🏻♀
वडिलांचा करारी बाणा
माऊलीच्या मायेचा उबदारपणा
Comments
Post a Comment