मायबोली...

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

जननी जन्मभूमी परि थोर मायबोली
ज्ञाना, तुका, कुसुमाग्रजाच्या साजाने नटलेली.....॥धृ॥

स्वर्गलोकीची अमृतधारा अवतरली भूवरी...
मराठी बाणा जपतो आम्ही मराठमोळे वारकरी ॥1॥

डोईवर सोनेरी मुकूट अन् नवरसाने शृंगारली...
कणखरता अस्तित्वाची रणरागिणी  सवे पेलली ॥2॥

जागतिकीकरण अन् तंत्रज्ञानाच्या  फेर्‍यात घुसमट तुझी जाहली...
जाज्वल शुद्धता, चिरंतनत्वता तसूभरही न ढळली ॥3 ॥

वाढवली शान अन् ज्ञानपीठरुपी तुरा रोवला शिरपेची...
होतो व्रतस्थ आम्ही किर्तीरुपे  पसरविण्या तूस देशोदेशी॥4 ॥

लाभो तुझ ऐश्वर्य, समृद्धी, अभिजातता...
अन् हृदयमंदिरी तेवणारी शाश्वत पवित्रता॥5॥

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Comments