सोहळा आषाढीचा
सोहळा आषाढीचा आला
मळा भक्तीचा फुलला
विठू गोजिरा पाहून
शीण- भाग हरपला
विठ्ल नाम ध्यानी मनी
रसना रंगली भजनी
रूप सावळे पाहूनी
धन्य धन्य वाटे मनी
टाळ घोष निनादला
सोहळा मुक्तीचा रंगला
जीव शिव एक झाला
नरदेह पावन झाला
करी करी कृपा देवा
तुझा विसर न व्हावा
तुझे नाम माझी काया
नको भेद विठूराया
डाॅ. माधुरी भोसले- फंड
हृदयस्पर्शी
ReplyDeleteThanks dear Asha
ReplyDelete