मायबोली
जननी, जन्मभूमी परी, थोर मायबोली
ज्ञाना, तुका कुसुमाग्रजांच्या साजाने नटलेली
स्वर्गलोकीची अमृतधारा अवतरली भूवरी
मराठी बाणा जपतो आम्ही मराठमोळे वारकरी
डोईवर सोनेरी मुकुट अन् नऊ रसाने शृंगारली
कणखरता अस्तित्वाची रणरागिणी सवे पेलली
जागतिकीकरण, अन् तंत्रज्ञानाच्या फेऱ्यात घुसमड तुझी जाहली
जाज्वल शुद्धता, चिरंतनत्वता, तसुभरही न ढळली
तू वाढवली शान आमुची, अन ज्ञानपीठरूपी तुरा
रोवला शिरपेची
आहे व्रतस्थ आम्ही कीर्ती रुपे पसरविण्या तुज देशोदेशी
लाभले तुझं ऐश्वर्य समृद्धी अभिजातता
अन् हृदया मंदिरी तेवणारी शाश्वत पवित्रता
Comments
Post a Comment